Bhandara APMC Elections : काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी
Bhandara APMC Elections : काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी
भंडारा जिल्ह्यातील चार ठिकाणी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपैकी भंडारा आणि लाखनी इथं आज तर, लाखांदूर आणि पवनीसाठी 30 एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भंडारा शहरातील नगर परिषद गांधी विद्यालयात चार गटांसाठी सहा मतदान केंद्र ठेवण्यात आले आहेत. तर, लाखनी बाजार समितीसाठी समर्थ विद्यालय लाखनी आणि नंदलाल कापगाते विद्यालय साकोली या ठिकाणी १० मतदान केंद्र राहणार आहेत. चारही बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळावर लढत आहेत. तर, नाना पटोले यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपशी हातमिळवणी केली आहे. या तीन पक्षांसोबत शिवसेनादेखील दोन बाजार समितीमध्ये रिंगणात आहे. दोन्ही बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात उभ्या 75 उमेदवारांना 4699 मतदार मतदान करणार आहेत.