Dhananjay Munde Resignation : धनजय मुंडे राजीनामा देणार, Karuna Munde यांची फेसबुक पोस्ट
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, वाल्मीक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खंडणीच्या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा उल्लेख या आरोपपत्रात आहे. तसेच, या प्रकरणात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा समावेश करण्यात आला आहे. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे, तसेच हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान वाल्मिक कराड या प्रकरणाचा सूत्रधार असल्याने आता मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची आता चर्चा रंगली आहे. अशातच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केलं आहे. करुणा मुंडे यांनी एक सूचक पोस्ट केलेली आहे, त्यात त्यांनी म्हटंल आहे, 3 मार्च 2025 रोजी राजीनामा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी गेल्या काही दिवसात सातत्याने होत आहेत. विरोधकांसह महायुतीतील काही आमदार देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावरती ठाम आहेत. अशातच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत, त्यांच्यावरती आरोप होत आहेत. त्यानंतर आथा पोलिसांच्या आरोपपत्रानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का? असा सवाल उपस्थित होत असतानाच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या























