एक्स्प्लोर
Anti-Conversion Law: 'धर्मांतरविरोधी कायदा लवकरच राज्यात येतोय, हेच षडयंत्र बंद करायचंय', Beed घटनेवरून Nitesh Rane आक्रमक
बीडच्या वडवणी शहरात १०० हून अधिक लोकांच्या कथित धर्मांतराच्या प्रयत्नाच्या (Religious Conversion) मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या राज्यामध्ये धर्मांतरविरोधी कायदा जेव्हा लागू होईल, तेव्हा हे सर्व जे षडयंत्र आहेत ते बंद होऊन जातील', असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. वडवणी शहरातील एका कॉम्प्लेक्समध्ये रविवारी सुमारे शंभर लोकांना पैशांचे आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार दाखल झाली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौघांना ताब्यात घेतले आणि प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून दिले. संपूर्ण चौकशीनंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, बीड शहरात गाडीला कट लागल्याच्या कारणावरून तरुणांच्या दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटनाही समोर आली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
Advertisement
Advertisement
























