Beed : बुलढाण्यानंतर बीडच्या गेवराईत बंपरचा पत्रा तुटलेली एसटी सुसाट, मोठ्या दुर्घटनेची शक्यता
बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये एसटीच्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले गेल्याची घटना ताजी असतानाच बीडच्या गेवराईतून एक धक्कादायक व्हीडिओ समोर आलाय.. गेवराईतील रस्त्यावर अशीच एक पत्रा तुटलेली एसटी धावताना दिसतेय... एसटीच्या पाठीमागच्या बंपरचा पत्रा तुटलेला पाहायला मिळतोय.. हा पत्रा रस्त्यावर घासत असल्याचं या व्हीडिओमध्ये पाहायला मिळतोय... या तुटलेल्या बंपरमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुलढाण्याच्या अपघातानंतर एसटी महामंडळानं धडा घेतला नाही का असा प्रश्न समोर येतोय. अशा एसटी बस रस्त्यावर उतरून आणखी किती अपघात घडण्याची वाट एसटी महामंडळ बघत आहे ? असा सवाल उपस्थित होतोय..






















