Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत तक्रार
औरंगाबाद : राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशात सरकारकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असं असताना मनसे प्रमुख राज ठाकरे मात्र जागोजागी विना मास्क फिरत असल्याचं दिसून येतं आहे. आता राज ठाकरे यांची मास्कद्वेश अंगलट येण्याची चिन्ह दिसत आहे. विनामास्क फिरण्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला असून अॅड.रत्नाकर चौरे यांनी केली राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
राज ठाकरे यांच्या विरोधात साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 1897 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी तक्रारदारांनी केली आहे. राज यांच्या मास्कविरोधी भूमिकेमुळं राज्यात कोरोना वाढल्याचा आरोप यात करण्य़ात आला आहे.























