एक्स्प्लोर
औरंगाबाद : तीस वर्ष अंधारात असलेलं बरड गाव प्रकाशमान, एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर वीजपुरवठा सुरू
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 ला लाल किल्ल्यावरून देशातल्या सौभाग्य योजनेतून सगळ्या वाड्या-वस्त्यांवर वीज पोहोचल्याची घोषणा केली होती. मात्र आजही अनेक गावात वीज पोहोचलेली नाही. असंच एक औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील बरड वस्ती हे गाव या गावातील दोनशे लोक गेल्या तीस वर्षांपासून अंधारात राहतात. यांच्या गावापासून विजेचा खांब 200 मीटर अंतरावर आहे. मात्र हे दोनशे मीटर चा अंतर कमी करण्याचे सौभाग्य मात्र ज्यांच्या नशिबी लाभलं नाही. पाहुयात तीस वर्षांपासून अंधारलेल्या या गावाची कहाणी.
आणखी पाहा























