Aurangabad : घाटी रुग्णालयातील नादुरुस्त व्हेंटिलेटर्सता अहवाल औरंगाबाद खंडपीठानं मागवला
औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटीत आलेले व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. याची दखल औरंगाबाद न्यायालयाने घेतली आहे. घाटीत किती व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत? याची माहिती पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. व्हेंटिलेटर प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचे नेमके वास्तव काय आहे, हे जाणून घेण्यासाठी खंडपीठाने पुढाकार घेतला आहे. नादुरुस्त व्हेंटिलेटर्स दुरस्तीची प्रक्रिया, तज्ज्ञांचे याबाबत मतही मागवले. तसेच शासन, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांच्याकडून खंडपीठ कार्यक्षेत्रातील 12 जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांना प्राप्त व्हॅटिलेटर्ससंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.























