Amravati Samruddhi Mahamarg : अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ABP Majha
अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर रात्री 1 वाजता पुन्हा भीषण अपघात झाला आहे.. नागपूर कडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला.. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. झोप लागल्याने चालक आणि वाहकाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे..
तर वर्धा जिल्ह्यात काल सायंकाळी दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.. वर्ध्याच्या आष्टी येथे दुचाकीवर फिरायला जाणाऱ्या तिघांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही अप्पर वर्धा धरण पहायला गेले होते. धरण पाहून दुचाकीने परत येत असताना आष्टी येथे रस्त्याच्या बॅरिकेटस वर दुचाकी धडकली, दुचाकीवरील दोघे तीस फूट लांब फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय..
तिसरा अपघात झाला तो बुलढाणा जिल्ह्यात.. सवणा ते चिखली एस टी बसचा अपघात आज सकाळी सात वाजेदरम्यान झाला.. स्टिअरिंग रोड लोक झाल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करत होते...