Shegaon Strike : शेगावमधील व्यापाऱ्यांचा संप मागे, जनजीवन पूर्वपदावर
शेवगाव शहरात झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव येथील व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद जरी शेवगावच्या व्यापाऱ्यांनी मागे घेतला असला तरी, पाथर्डी तालुक्यातील तिसगावमध्ये या घटनेच्या निषेधार्थ आज बंद पाळण्यात येत आहे...सकल हिंदू समाजाच्या वतीने तसेच स्थानिक व्यापाऱ्यांच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आलीये...शेवगाव शहरात दगडफेक करत शहरातील वातावरण दुषित करणाऱ्या सर्वच आरोपींना ताब्यात घ्यावेत...या घटनेच्या मुळाशी जाऊन मुख्य सुत्रधाराला ताब्यात घ्यावे..या मागणीसाठी हा बंद पाळला जातोय...या बंदला तिसगाव येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे...एकीकडे शेवगाव येथील व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला असला तरी शेवगाव शहरातील घटनेचे पडसाद इतर ठिकाणी उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.























