Shrigonda Aashadhi Wari 2023: संत महंमद महाराजांच्या पालखीचं प्रस्थान
Shrigonda Aashadhi Wari 2023: संत महंमद महाराजांच्या पालखीचं प्रस्थान अहमदनगरच्या श्रीगोंदा येथील संत श्री महंमद महाराजांची दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे...हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या शेख महंमद महाराजांची दिंडी यंदा पहिल्यांदाच पंढरपूरकडे मार्गस्थ झालीये...संत महंमद महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे समकालीन सुफी संत होते... या दिंडीत जवळपास दोन हजार भाविकांनी सहभाग घेतलाय... यंदा प्रथमच दिंडी जात आहे मात्र पुढच्या वर्षी वारकऱ्यांची संख्या अधिक राहू शकते असं आयोजकांनी म्हंटलंय...एकीकडे राज्यात आणि देशात हिंदू-मुस्लिम वादाच्या घटना घडत आहेत तर दुसरीकडे अशा पद्धतीने एका मुस्लिम सुफी संतांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असल्याने समाजापुढे एक वेगळा आदर्शच या निमित्ताने ठेवला गेलाय...यावेळी सकाळी मान्यवरांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात आले त्यानंतर शेख महंमद महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून हरिनामाचा जयघोष करत पालखी मार्गस्थ झाली.
![Murlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/cf34d8b0efbd9d6d8aa64adcd4e8d7511735904943216976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Manoj Jarange Full PC : मराठा बांधवांनी शांततेत नारायणगडावर यावं; मनोज जरांगेंचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/12/3c71a74aadc468b0f6feee0f4268df861728709427659719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ahmednagar : शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी उपोषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/30/911e21117ad6dbf2e6d4916e6b23a19c172769659809490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rohit Pawar : Karjat Jamkhed मध्ये रोहित पवारांना धक्का, Madhukar Ralebhat यांचा राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/26/a267e0adcd7b454888810d3c1b157845172464820656290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/19/4408de29647a8e3d5ae47e77985deb351724071490907261_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)