Kisan Long March : नगर जिल्ह्यातील अकोलेमधून दुपारी शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणार
शेतकऱ्यांसह आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा लाल वादळ रस्त्यावर उतरणार आहे. अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले ते लोणी असा ५५ किलोमीटर अंतर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे... दुपारी ३ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर काल मुंबईत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज दुपारी या लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे... तीन दिवस चालणाऱ्या या लॉंगमार्चमध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.. 28 एप्रिल चा हा मोर्चा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात धडकणार आहे... पोलिसांनी मात्र अद्याप या मोर्चाला परवानगी दिली नसली तरी शेतकरी मोर्चावर ठाम आहेत...























