Eknath Shinde : नाशिकनंतर एकनाथ शिंदे नगर-धाराशिवमध्ये, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची करणार पाहणी
अवकाळी पावसामुळे वर्षभर मेहनतीनं पिकवलेलं सोन्यासारखं पिकं मोतीमोल झालंय.. शेतमालाचं झालेलं प्रचंड नुकसान पाहून बळीराजा पुरता हवालदिल झालाय.. दरम्यान अयोध्या दौरा आटपून काल मुख्यमंत्री थेट नुकसानीच्या पाहणीसाठी शेतकऱ्याचा बांधांवर पोहोचले.. मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिक जिल्ह्यातील सटाणामध्ये पाहणी केली.. अवकाळीचा सर्वात जास्त फटका नाशिक जिल्ह्याला बसलाय.. त्यामुळे पाहणी करुन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत..दरम्य़ान आज मुख्यमंत्री शिंदे अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.. अहमदनगर आणि धाराशिवमधील नुकसानाचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा घेतला जाणार आहे....अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात तर धाराशिवमधील धारूर, वाडीबामणी गावात नुकसानाची पाहणी करतील.























