Adil Family on Pahalgam Attack : दहशतवाद्यांना नडला, अतिरेक्यांची रायफल धरली; पर्यटकांना वाचवण्यासाठी आदिलने 4 गोळ्या खाल्ल्या
Adil Family on Pahalgam Attack : दहशतवाद्यांना नडला, अतिरेक्यांची रायफल धरली; पर्यटकांना वाचवण्यासाठी आदिलने 4 गोळ्या खाल्ल्या
Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, यात पर्यटकांना बैसनर या ठिकाणी खच्चरहून नेणाऱ्या आदिल सय्यद हुसेन शाह (Syed Adil Hussain Shah) याचाही मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी याठिकाणी गोळीबार सुरु केला तेव्हा आदिल हुसेन शाह याने त्याला विरोध केला होता. तो पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांना भिडला होता. आदिलने दहशतवाद्यांच्या हातामधील रायफल खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दहशतवादी संतापले होते. दहशतवाद्यांनी आदिलचे कपडे काढून त्याला गोळ्या घालून ठार केले होते. एकीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदू-मुस्लीम असा भेद निर्माण केला जात असताना आदिलने दिलेले बलिदान टीकाकारांसाठी सणसणीत चपराक ठरली होती. (Pahalgam Terror Attack)
आदिलच्या कुटुंबियांच्या भेटीला 'एबीपी माझा'ची टीम गेली तेव्हा हपतानादमध्ये आदिलच्या गावी शोकाकुल वातावरण होतं, ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी सलीम कुरेशी हे देखील तिथे होते. त्यांनी सांगितले की, आजही तो प्रसंग डोळ्यासमोरून जात नाही. अचानक झालेल्या गोळीबारानंतर काहीच सुचत नव्हते. तरी आम्ही शेकडो पर्यटकांना तिथून सुरक्षित ठिकाणी हलवत होतो. असंख्य मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. ही घटना चुकीची आहे. या घटनेमुळे आज कधी नव्हे ते पहलगाम बंद आहे. आमच्या सारख्या असंख्य खच्चरहून पर्यटकांना नेहणार्यांच्या पोटावर पाय या दहशतवाद्यांनी दिला आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो, असे सलीम कुरेशी यांनी सांगितले.
दुसरीकडे आदिलच्या भावाशी आम्ही बातचीत केली तेव्हा त्याने सांगितले की, दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर आदीलचा फोन बंद येत होता. कुटुंबियांना त्याची चिंता वाटत होती. श्रीनगरला सर्व मृतदेह येत असताना एका महिला रडत होती. मी तिली धीर देत सात्वन करण्याचा प्रयत्न केली. माझाही भाऊ यात गेल्याचं सांगितलं तेव्हा त्या महिलेने मला सांगितलं. माझ्या भावाने त्यांना वाचवलं. महिलेने सांगितले की, आदिलने पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. भावाने त्याचा मृतदेह स्वीकारताना पाहिलं तेव्हा दहशतवाद्यांची बंदूक धरल्याने हात भाजले होते. दहशतवाद्यांनी त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मात्र, आदिलच्या प्रतिकारामुळे काही पर्यटकांचे प्राण वाचले, असे त्याच्या भावाने सांगितले.






















