एक्स्प्लोर
NCB | भारती सिंह पाठोपाठ पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीकडून अटक
कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरात अंमली पदार्थ विरोधी विभागाने छापा टाकला. त्यानंतर कॉमेडियन भारती सिंगला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. तर तिचा नवरा हर्ष लिंबाचिया याची चौकशी सुरु होती. आता तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान एनसीबीने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यात एनसीबीला संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला. दुपारी तीन वाजल्यापासून सुरु असलेल्या चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली. आज भारती सिंहला एनसीबी कोर्टात सादर करणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
धाराशिव
निवडणूक
महाराष्ट्र























