एक्स्प्लोर

Sumitra Bhave Death | ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

पुणे : अस्तु, दहावी फ, नितळ, संहिता, दोघी, वेलकम होम, एक कप च्या असे अत्यंत तरल आणि पठडीबाहेरचे विषय अत्यंत सोप्या, सहज पद्धतीने चित्रपटात मांडणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन झालं. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात त्यांनी सोमवारी (19 एप्रिल) सकाळी सव्वासात वाजता अखेरचा श्वास घेतला. 

सुमित्रा भावे यांनी 1980 च्या दशकापासून चित्रपट या माध्यमाला आपलंस करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी काही लघुपट बनवले. त्यांनतर त्यांनी चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुनील सुकथनकर यांची त्यांना मोलाची साथ लाभली. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दोघांनी मिळून जवळपास 17 अत्यंत महत्वाचे चित्रपट दिले. पैकी दहावी फ, दोघी, अस्तु, नितळ, कासव आदी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. त्यांनी दिग्दर्शिक केलेल्या 'कासव' या चित्रपटाने 2017 मध्ये सुवर्ण कमळही मिळवलं. 

सुमित्रा भावे या केवळ दिग्दर्शिका नव्हत्या. तर त्यांचं लेखनही तितकंच महत्वाचं होतं. कथा, पटकथा, गीतलेखन आदी विभागात त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे. जगण्याजवळ जाणारे विषय अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मांडताना त्याची मांडणी त्यांनी कधीच बोजड वा अवघड होऊ दिली आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी महत्त्वाचे विषय तितक्याच हळूवारपणे मांडले. 'अस्तु' या चित्रपटात त्यांनी अल्झायमर झालेल्या व्यक्तीची मानसिकता मांडली. तर 'दहावी फ'सारख्या चित्रपटातून त्यांनी मुलं आणि शिक्षक यांच्या नातेसंबंधाना अधोरेखित केलं होतं. ते करताना मुलांच्या मानसिकतेचा उभा छेद त्यांनी आपल्या चित्रपटातून मांडला होता. चित्रपट हे माध्यम सर्जनशील आहेच. कलात्मक आहे. पण त्यासाठी प्रचंड शारीरिक, मानसिक कष्ट लागतात. मोठी आर्थिक उलाढाल असते. तरीही चित्रपट हे शिक्षणाचं, परिवर्तनाचं महत्त्वाचं माध्यम आहे असं त्या आवर्जून नमूद करत. 

सुमित्रा भावे यांच्या फुप्फुसात गेल्या काही महिन्यांपासून संसर्ग झाला होता. त्यासाठीचे उपचारही त्या घेत होत्या. दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. पण ती निगेटिव्ह आली होती. फुप्फुसाच्या संसर्गाचे उपचार चालू असतानाच गेल्या 15 दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अखेर सोमवारी सकाळी सव्वासात वाजता त्यांचं निधन झालं.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत
100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत
बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच 'या' फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ
बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच 'या' फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ
Marathi Actor On Viral Vaidu More Video: 'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..
'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget