Salman Khan Gunfire Update : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापानं जीवन संपवलं
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे पश्चिम येथील गॅलक्सी अपार्टमेंट या इमारतीबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातल्या एका आरोपीनं पोलीस कोठडीत आत्महत्या केली. अनुज थापन नावाच्या आरोपीनं पोलीस कोठडीत चादरीनं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नजिकच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सागर पाल आणि विकी गुप्ता या शूटर्सना शस्त्रात्रांचा पुरवठा केल्याप्रकरणी अनुज थापन आणि सोनूकुमार बिष्णोई यांना पंजाबमधून अटक करण्यात आली होती. अनुजला या प्रकरणातल्या इतर सहा आरोपींसह एकाच कोठडीत ठेवण्यात आलं होतं. सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात अनुजकडून लॉरेन्स बिष्णोई गँगबाबत महत्वपूर्ण माहिती मिळणं अपेक्षित होतं.























