एक्स्प्लोर

Sushma Andhare on Election Result 2024 : बाप बाप होता हैं! PM Modi कळलं असेल 'असली' कोण! Lok Sabha

Sushma Andhare on Election Result 2024 : बाप बाप होता हैं! PM Modi  कळलं असेल 'असली' कोण! Lok Sabha

मुंबई : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election Result) मतमोजणी सुरु झाल्यानंतर आता चार तास पूर्ण झालेले आहेत.  लोकसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती आले असून त्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरूद्ध महायुती  (Mahayuti)  अशी रंगतदार आणि घासून लढत सुरू आहे. अंतिम निकाल अगदी काहीच वेळात हाती येणार असून राज्यात कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.कोणाचे सरकार स्थापन होणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणूक निकालात देशातील काही उमेदवरांना अपेक्षित यश मिळाले आहे तर काही उमेदवारांना मोठा लीड मिळाला आहे. देशातील  ज्या उमेदवारांना एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळले अशा उमेदवारांविषयी जाणून घेऊया .  देशातील या लाखमोलाच्या उमेदवारांवर  एक नजर टाकू या.

 

लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालांची आकडेवारी समोर येत असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईवर प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार सध्या महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. त्यामध्ये , दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या साईटवरील आकडेवारीनुसार लाखापेक्षा अधिक लीड घेतलेल्या  उमेदवारांच्या मतांची माहिती देण्यात येत आहे. 

प्रतिभा धानोरकर - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात  12 पर्यंत झालेल्या  मतमोजणीनंतर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 1 लाख मतांनी  आघाडीवर आहे. प्रतिभा धानोरकरांच्या विरोधात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार उभे होते. 

ओमराजे निंबाळकर -  धाराशिव लोकसभा मतदारसंघ

उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) नामांतर झाल्यानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची ठरली. लोकसभा मतदारसंघाचे पहिले कल हाती आले असून 12 वाजेपर्यंतचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर, अर्चना पाटील पिछाडीवर आहेत. 

नरेश म्हस्के- ठाणे लोकसभा मतदारसंघ

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणेनगरीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election 2024) दुहेरी लढत पाहायला मिळाली. ठाणे लोकसभेचे  शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना देखील एक लाखाचा लीड मिळाली आहे

राजाभाऊ वाजे  - नाशिक लोकसभा मतदारसंघ

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ( ठाकरे गट ) राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत.  व्या फेरी अखेर वाजे यांनी घेतली 1,47,012 आघाडी घेतली आहे.  राजाभाऊ वाजे यांचा नाशिक लोकसभा मतदार संघातून विजय निश्चित आहे.

गोवल पाडवी - नंदुरबार लोकसभा मतदारसंघ (Nandurbar Loksabha)

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला विजय जवळपास निश्चित झाला असून नंदुरबारमधून गोवाल पाडवी (Goval Padvi) हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.  गोवाल पाडवी हे तब्बल 1 लाख 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचा महाराष्ट्रात पहिला विजय निश्चित मानला जात आहे. काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांना 18 व्या फेरीअखेर  1लाख 70 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

राहुल गांधी - वायनाड

राहुल गांधींनी वायनाडमधून मोठी लीड मिळवला असून राहुल गांधी  दोन लाखा मतांनी आघाडीवर आहे.

पीयूष गोयल - उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ 

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी तब्बल 131898 मतांनी  मतांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या स्थानावर काँग्रेस भूषण पाटील  आहेत. 

 श्रीकांत शिंदे  - ठाणे लोकसभा मतदारसंघ

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे.मतमोजणीला सुरूवात झाली असून कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे आघाडीवर आहेत. शिंदे 129725 मतांनी आघाडीवर  आहेत.  
 महाविकास आघाडीमध्ये कल्याणची ही जागा ठाकरे गटाकडे आली आणि त्यांनी वैशाली दरेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली होती. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget