Election : एक उमेदवार एकाच जागेवर लढू शकणार, निवडणूक आयोगाने केंद्राकडे पाठवला प्रस्ताव
विजयाची शाश्वती नसेल तर अनेक उमेदवार एकाच वेळी दोन जागांवर निवडणूक लढवून आपलं नशीब आजमावतात... पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांना अशी दोन जागी निवडणूक लढवताना आपण पाहिलंही आहे... मात्र आता असं दोन जागी नशीब आजमावणाऱ्या लोकप्रतिनिधींना भविष्यात या संधीला मुकावं लागू शकतं. कारण एकाच वेळी दोन जागांवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगानं केंद्राकडे पाठवला आहे... केंद्राच्या विधी विभागासमोर हा प्रस्ताव मांडण्यात आलाय.. या सोबतच मतदार कार्ड आधार कार्डाशी लिंक करणे, एक्झिट पोलवर बंदी घालणे यासह इतर सहा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत...























