एक्स्प्लोर
VaccineForAll 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांचं लसीकरण विद्यापीठामार्फत करण्याचा विचार: मंत्री उदय सामंत
राज्यातील सर्व विद्यापीठांच्या उर्वरीत सर्व परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत म्हणाले की, आज कुलगुरूंसोबत परीक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. आता उर्वरीत सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असं उदय सामंत म्हणाले. सामंत म्हणाले की, तेराही अकृषी विद्यांपीठात उद्यापासून ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. टीवायचीही परीक्षा ऑनलाईन असेल, असं उदय सामंत म्हणाले.
आणखी पाहा


















