एक्स्प्लोर
Mumbai University च्या Library ची दुरावस्था, विद्यापीठाला पुस्तकाचं मोल नाही?
मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुरावस्था झालीय.. या ग्रंथालयात अनेक जुन्या पुस्तकांची संपदा आहे. योग्य ती काळजी न घेतल्यानं इथल्या जुन्या ग्रंथसंपदेला अक्षरशः वाळवी लागलेय. ६० ते ७० वर्ष जुनी अनेक पुस्तकं पूर्णपणे खराब झाली आहेत.. ग्रंथालयातील मराठी भाषा विभाग हा चार वर्षापासून बंद असल्यानं इथल्या पुस्तकांचंही पूर्णपणे नुकसान झालं. कालिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाकडे सध्या विद्यापीठ प्रशासनाचं संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचं समोर येतंय. मात्र ही हेळसांड होत असल्यानं ग्रंथालयातील अनेक दुर्मिळ पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्रे यांचा ठेवा धोक्यात आला.
आणखी पाहा


















