एक्स्प्लोर
'पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली', राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निर्णय
आमदार कपिल पाटील यांनी पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परिक्षांबाबत 29 एप्रिल रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना पत्र लिहलं होतं. 4 मे रोजी शिक्षण आयुक्तांनी कपिल पाटील यांच्या पत्रावर रिमार्क मारत 'परीक्षा रद्द करण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात' असे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला दिले होते. त्यानुसार पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी आज जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
आणखी पाहा


















