एक्स्प्लोर
School Admission Rules : शाळा प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश मिळणार
विद्यार्थ्यांला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असल्यास त्याला शाळा सोडल्याचा दाखला TC (transfer certificate ) /LC (leaving certificate) आवश्यक असते. मात्र, सध्याच्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (T.C/L.C) काही शाळा नाकारत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल्याची गरज नसणार आहे. या निर्णयामुळे टीसी नसल्यामुळे शाळेत प्रवेश मिळत नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















