एक्स्प्लोर
NIA कडून Sachin Vaze यांच्या कार्यालयाची झाडाझडती; मोबाईल फोन, आयपॅड जप्त
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या कार्यालयाची एनआयएने झाडाझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. यावेळी मुंबई पोलीस दलातील अधिकारीही उपस्थित होते. पुराव्यांच्या अनुषंगाने ही झाडाझडती करण्यात आली. एनआयएने रात्री 8 ते पहाटे 4 पर्यंत CIU ची पाहणी केली. यावेळी एनआयएने सचिन वाझे यांचा मोबाईल फोन, तसंच आयपॅडही जप्त केलं. दरम्यान या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत CIU च्या दहा अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























