Charles Sobhraj : बिकिनी किलर चार्ल्स शोभराज तुरुंगातून सुटणार, वयाच्या कारणास्तव सुटका
दोस्ती, ड्रग्ज आणि मर्डर... अशी थरारक मोडस ऑपरेंडी वापरून हत्या करणारा कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराज नेपाळमधील काठमांडूच्या तुरूंगातून बाहेर येणारेय. बिकिनी किलर अशी ओळख असलेला चार्ल्स शोभराज २००३ पासून नेपाळमध्ये तुरूंगाची हवा खात होता. वयाच्या आधारावर त्याची तुरूंगातून सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चार्ल्स शोभराजने भारतासह थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये २० हून अधिक हत्या केल्यायत. बिकिनी घातलेल्या परदेशी तरुणी चार्ल्सच्या टार्गेटवर असायच्या. आकर्षक व्यक्तिमत्वामुळे परदेशी मुलींशी तो आधी मैत्री करायचा, नंतर त्यांना ड्र्ग्ज पुरवायचा आणि त्यांची लूट करून हत्या करायचा. महत्त्वाचं म्हणजे जगभरातील अनेक भाषांमध्ये तो पारंगत होता. वेष बदलून जगभरातील अनेक देशांमध्ये त्याने दोस्ती, ड्रग्ज आणि मर्डर अशी खतरनाक त्रिसूत्री अवलंबली होती. दरम्यान, तुरूंगातून बाहेर आल्यानंतर १५ दिवसांच्या आत त्याला हद्दपार करण्याचेही आदेश देण्यात आलेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
