बेळगावच्या रायबागमध्ये फळविक्री करणाऱ्या तरुणीवर अज्ञाताचा अॅसिड हल्ला,अॅसिड हल्ल्यानंतर तरुणी गंभीर
रायबाग येथे रस्त्याच्या कडेला बसून फळे विक्री करणाऱ्या तरुणीवर एका व्यक्तीने अँसिड टाकून लगेच पळ काढला. ॲसिड हल्ल्यामुळे जखमी झालेली तरुणी वेदनेने आकांत करत होती. लगेच तेथे असलेल्या लोकांनी घागरितून पाणी आणून त्या तरुणीवर ओतले.वेदनेने ती तरुणी रस्त्यावर गडाबडा लोळत होती.उपस्थितांनी रुग्णवाहिका बोलवून तिला रयबाग येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. तरुणीच्या गळ्याला ॲसिड मुळे भाजून गंभीर दुखापत झाली आहे. पुढील उपचारासाठी तिला बेळगावला जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. ॲसिड हल्ल्याच्या घटने नंतर एक तासातच पोलीस स्थानकात जावून ॲसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीने सरेंडर केले. आपण विषही प्राशन केले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.























