एक्स्प्लोर
UNCUT | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जालन्यातील संपूर्ण भाषण | एबीपी माझा
भाजपला रोखण्यासाठी विरोधक एकत्र आले पण विरोधकांची ही महाआघाडी कुचकामी ठरेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे. जालन्यात आज भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विकासकामांची माहिती दिली. त्यात कर्जमाफी, सिंचन, पिकविमा, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील कामांचा पाढा वाचला. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही तोवर ही योजना बंद होणार नाही असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. तसंच आज हाती आलेल्या नगरपालिका आणि परिषदांच्या निकालावरुनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला हाणला.
आणखी पाहा





















