Edible Oil Rate Decrease : गगनाला भिडलेले खाद्यतेलाचे दर कमी होणार, 10 ते 15 रुपयांचा होणार फायदा
गेल्या काही महिन्यांमध्ये गगनाला भिडलेले खाद्यतेलाचे दर आता काहीसे कमी झाले असून हे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तेल उत्पादक कंपन्या आणि मार्केटिंग कंपन्यांना विचारणा केली आहे. त्यामुळे तेलाचे दर प्रति लिटर 10 ते 15 रुपयांनी कमी होण्याचा अंदाज आहे. रशिया - युक्रेन युद्ध तसंच इंडोनेशियाने तेल निर्यातीवर लावलेल्या निर्बंधामुळे गेल्या काही महिन्यात खाद्यतेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती. तेलाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशालाही कात्री लागत होती. मात्र, आता बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत झाला असून दर काहीसे कमी होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या पुढाकारामुळे हे दर आणखी कमी होणार आहेत. त्यामुळे सरकारला महागाई नियंत्रित करण्यासही मोठी मदत होणार