Zero Hour : टी 20 विश्वचषकाच्या तुलनेत ऑलिम्पिकचं यश नगण्य ?
Zero Hour : टी 20 विश्वचषकाच्या तुलनेत ऑलिम्पिकचं यश नगण्य ?
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑलिंम्पिंक, पॅराआलिंम्पिंक सूवर्णपदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्य पदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास लाख, तीस लाख व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. त्यामुळे, ऑलिंपिकवीर खेळाडू आता चांगलेच मालामाल होणार आहे. गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑलिंपिकवीर (Olympic) खेळाडूंना तब्बल 5 कोटी रुपयांचे बक्षीस राज्य शासनाच्यावतीने (Government) देण्यात येणार आहे. ऑलिंपिक, वर्ल्ड चॅम्पियनशीप, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, युथ ऑलिंम्पिक खेळाडूंच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सांघिक क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्याही पारितोषिक रकमेक वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी राज्य सरकारकडून ऑलिंपिक विजेत्यांना 1 कोटी रुपये देण्यात येत होते.