Zero Hour : नारायण राणेंना उमेदवारी, महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्गचा तिढा सुटला
Zero Hour : नारायण राणेंना उमेदवारी, महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्गचा तिढा सुटला
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरुन महायुतीत सुरु असलेला तिढा अखेर आज सुटला. भाजपने या जागेवर आपला दावा यशस्वी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचे उमेदवार असतील. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. शिवसेनेच्या उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेवरुन लढण्यासाठी इच्छुक होते, आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. यानंतर लगेच भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहिर केली. उमेदवारी जाहीर होताच राणेंनी त्यांच्या ग्रामदेवतेचं सपत्नीक दर्शन घेतलं. या जागेवरुन कोणताही तिढा नव्हता असं राणेंनी सांगितलं. विकासाचा आणि मोदींचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार अस राणे म्हणाले. सामंत बंधूंचे आभार मानायलाही ते विसरले नाहीत.