Zero Hour : Manoj Jarange यांची भाषा आणि कार्यपद्धतीवर Rajendra Raut यांचा आक्षेप
Zero Hour : Manoj Jarange यांची भाषा आणि कार्यपद्धतीवर Rajendra Raut यांचा आक्षेप
एकदा स्वागत.. सोलापूर बार्शीचे मराठा आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगेंमधील वादाचं विश्लेषण केलं...
बार्शीच्या राजकारणात राजेंद्र राऊत हे माजी मंत्री दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक आहेत. सोपलांना हरवून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत.. अनेक दशकं कट्टर शिवसैनिक.. त्यानंतर अल्प काळ काँग्रेस आणि नंतर अपक्ष अशी त्यांची वाटचाल राहिली आहे.. २०१९ नंतर फडणवीस समर्थक अशी त्यांची ओळख बनली आहे.. मविआ सरकार असताना ते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुद्धा होती.. ते कुठेही असले तरी मराठा समाजासाठी काम करायला सदैव तत्पर अशी सुद्धा त्यांची एक ओळख आहे.. त्यामुळेच मनोज जरांगेंच्या आंदोलनातही त्यांनी साथ दिली पण जरांगेंनी सोपलांची भलामण सुरु केली आणि राऊत अस्वस्थ झाले.. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर पेच सुटणं गरजेचं आहे अशी त्यांची भूमिका आहे.. कारण काही का असेना राजेंद्र राऊत यांच्या रुपाने पहिल्यांदा एका मराठा आमदाराने जरांगेंच्या आंदोलनात काही त्रुटी आहेत असे म्हणत त्या समोर ठेवायला सुरुवात केलीय .. आत्तापर्यंत मनोज जरांगेंसमोर मराठा विरुद्ध ओबीसी अशी सोपी निवड होती.. आता त्यांना महायुतीचा मराठा उमेदवार की मविआचा मराठा उमेदवार अशी निवड करावी लागणार आहे आणि ते त्यांना मानणाऱ्या मराठा समाजाला समजावून सुद्धा सांगावं लागणार आहे.. आणि ही गोष्ट आपल्याला वाटते तेवढी सोपी नक्कीच नसेल.. झीरो अवरमध्ये वेळ झालीय इथेच थांबण्याची... मात्र, या छोट्याश्या ब्रेकनंतर बाप्पा माझा स्पेशल .. पुण्याच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची आरती