Zero Hour : महायुती, महाआघाडीत जागा वाटपाचा तिढा, पक्ष वाढले आणि नाराजीही वाढली
Zero Hour : महायुती, महाआघाडीत जागा वाटपाचा तिढा, पक्ष वाढले आणि नाराजीही वाढली
महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा ४८... पण पक्ष भरमसाठ.. आधी बरं होतं.. युतीत शिवसेना-भाजप.. आणि आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी.. पण गेल्या दोन वर्षांत शिवसेना-राष्ट्रवादीच्या फाटाफुटीमुळे प्रत्येकी एकाचे दोन झाले.. सत्तेत येण्यासाठी फायदा झाला.. पण म्हणतात ना की नाण्याला दोन बाजू असतात.. तीच दुसरी बाजू जागावाटपावेळी समोर आली.. पक्ष वाढले आणि नाराजी हि वाढली .. दोन्ही बाजूला .... अजूनही महायुतीत अद्यापर्यंत भाजपने २४, शिवसेनेने ८ आणि राष्ट्रवादीने ४ उमेदवार दिले.. असे एकूण ३६ जागांवर नाव फायनल झालाय ... तरी १२ जागांवर उमेदवाराचा पत्ता नाही.
तिकडे महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १७, काँग्रेसने १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ५ असे एकून ३४ उमेदवार जाहीर केले.. उरल्या १४ जागा ... तिढा मात्र १४ पेक्षा हि जास्त जागांचा सांगितलं जातोय कारण एकाने दिलेला उमेदवार दुसऱ्याला मान्य नाही... आणि म्हणूनच जशी या उर्वरीत जागावाटपांची उत्सुकता राजकीय पक्षांना आहे, तशीच उत्सुकता जागरूक मतदारांनाही असणार आहे...
आणि यावरच आम्ही तुम्हाला आजच्या भागातला पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारला होता.. तो प्रश्न पाहण्यासाठी जावूया पोल सेंटरवर...