Zero Hour Full : शेंडगेंकडूनही सर्वेक्षणाची घोषणा, विधानसभेला मराठा वि. ओबीसी संघर्ष?
Zero Hour Full : शेंडगेंकडूनही सर्वेक्षणाची घोषणा, विधानसभेला मराठा वि. ओबीसी संघर्ष? लोकसभेच्या निकालानंतरचा गुलाल हवेत विरण्याआधीच राज्यात विधानसभेचा धुरला उडायला सुरुवात झालीय. कालच शिवसेनेच्या दोन्ही गटांनी वर्धापनदिनाच्या भाषणात विधानसभेचं रणशिंग फुंकलंय.. आणि याच निवडणुकांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष केंद्रस्थानी असेल की काय? असा सवाल सुरु उपस्थित झालाय.. तुम्हाला काही महिन्यापूर्वीचं अंतरवाली सराटी आठवतंय का? जिथं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगेंनी आंदोलन केलं होतं.. त्यांच्या भेटीला नेत्यांच्या रांगा लागल्या होत्या.. अगदी हेच चित्र आज... अंतरवाली सराटीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वडीगोद्रीत दिसतंय.. इथं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसींसाठी उपोषणाला बसलेत.. त्याला आठ दिवस होतायेत.. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांच्या उपोषणस्थळी राज्यातल्या ओबीसी नेत्यांची रीघ लागलीय.. हेच लक्ष्मण हाके आज आपल्यासोबत गेस्ट सेंटरला असणार आहेत.. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोतच.. मात्र, राज्यातल्या दोन्ही आरक्षण आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळं निर्माण होण्याची स्थिती निर्माण झालीय.. आणि त्याचे पडसाद विधानसभेत उमट्याची शक्यता झालीय... ज्याची सुरुवात अंतरावलीत झालीय.. कारण, उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगेंनी आता पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिलंय. कारण, मराठ्यांना ओबीसींनी आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगेंनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिलाय़. इतकंच नाही तर राज्यातल्या सगळ्या दोनशे अठ्ठ्यांशी जागांची चाचपणी सुरू केलीय.. त्यातल्या एकशे सत्तावीस मतदारसंघाचं सर्व्हेक्षणही पूर्ण झालंय.. असा दावा मनोज जरांगेंनी केलाय.