Zero Hour : बारामतीसाठी नणंद-भावजयचा अर्ज दाखल, बारामतीत गाजणार 'सुने'चा मुद्दा
Zero Hour : बारामतीसाठी नणंद-भावजयचा अर्ज दाखल, बारामतीत गाजणार 'सुने'चा मुद्दा
रत्नागिरी-सिंधुदुर्गासाठी सुरु असलेल्या शिवसेनेचे किरण सामंत आणि भाजपचे नारायण राणे ह्या संघर्षात सामंतांनी उमेदवारीची तलवार म्यान केली.. आणि नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी अधिकृत रित्या जाहीर झाली.. यासह राज्यातल्या सगळ्याच राजकीय घडामोडींचं विश्लेषण आपण करणार आहोतच.. मात्र, झीरो अवरची सुरुवात बारामतीतून करुयात..
आज बारामती मतदारसंघात नणंद-भावयज.. यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल तर केलेच पण सोबत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीनं पूर्ण ताकत लावली
बारामतीमध्ये सर्वच कार्यक्रम पावर packed होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मित्र पक्ष आरपीआयचे रामदास आठवले असे तिघे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी अर्ज दाखल करून घेताना हजर होते. नंतर अजित पवारांसह ह्या सर्व नेत्यांनी जंबो रॅली हि केली. तर दुसरीकडे पुण्यात महाविकास आघाडीनं असाच महामेळावा आयोजित केला.. शरद पवारांच्या उपस्थित पार पडलेल्या मेळाव्याआधीच सुप्रिया सुळेंनीही अर्ज दाखल केला..