Zero Hour :महाराष्ट्रात शांतता भंग करणाऱ्यांचा माज उतरवणार? फडणवीसांच्या दाव्यानं गुन्हेगारीला आळा?
Zero Hour :महाराष्ट्रात शांतता भंग करणाऱ्यांचा माज उतरवणार? फडणवीसांच्या दाव्यानं गुन्हेगारीला आळा?
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची एकीकडे सांगता होत असताना तर दुसरीकडे राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये गुन्हेगारीत लक्षणीय वाढ होताना दिसतेय. खरं तर, गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच... कारवाईचा दणकाही सुरु आहे... त्याची आकडेवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहासमोर मांडलीय... अगदी गेल्या दहा दिवसांमधल्या घटना पाहिल्या.. तर त्याची सुरुवात होते बीडच्या मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येनं... तिथपासून अगदी आज संध्याकाळी मुंबईत मराठी विरुद्ध बिहारी.. अशा झालेल्या संघर्षाचा यात समावेश होतो. याच घटनांमध्ये हत्याकांड आहे.. हिंसक मारहाण आहे.. प्रेमप्रकरणातून हत्या आहे.. राजकीय कार्यालयांची तोडफोड आहे.. दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आहे.. गावगुंडांची दहशत आहे.. महिलेचा विनयभंगही आहे.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे... याच घटनांवरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय... मंडळी... किती घटना सांगायच्या.... जितक्या घटना सांगू.. तितक्या त्या कमीच पडतील.. पण, त्यासोबतच एक गोष्ट मात्र, विश्वासानं सांगायला हवी.. ती म्हणजे या सगळ्या घडामोडी होत असतानाच.. पोलिसांनीही धडक करवाया सुरु केल्या आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सगळ्यात मोठा इशारा दिलाय.