Zero Hour : मोदींसोबत जाण्याबाबत ठाकरे कुटुंबात एकमत; रवी राणांचा मोठा दावा
Zero Hour : मोदींसोबत जाण्याबाबत ठाकरे कुटुंबात एकमत; रवी राणांचा मोठा दावा भाजप नेते प्रसाद लाड यांनी मातोश्री बंगल्यावर फोन करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी उद्धव ठाकरेंकडे वेळ मागितली.. अर्थात अनेक माध्यमांनी अशीच बातमी चालवली.. पण, एबीपी माझानं बातमीची सत्यता पडताळली.. थेट प्रसाद लाड यांनाच फोनचं वृत्त किती खरं.. किती खोटं हे विचारलं.. आणि प्रसाद लाड यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं.. की त्यांनी असा कोणताही फोन केला नाही.. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली नाही.. त्यामुळे वेगवेगळ्या वाहिन्यांनी केलेले फोनसंदर्भातले दावे खोटे ठरले.. आता वळुयात पुन्हा एकदा वळुयात लोकसभा निवडणुकीकडे... या निवडणुकीत चौंसष्ट कोटी वीस लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात एकतीस कोटी २० लाख महिला मतदारांचा समावेश आहे. आणि उद्याच्या निकालात याच महिला मतदारांचा निर्णायक वाटा असणार आहे. २०१४ आणि २०१९ साली मोदी सरकार सत्तेत येण्यात याच महिला शक्तीचा आणि युवा शक्तीचा मोठा वाटा होता. यावेळच्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे यावेळी इंडि आघाडीने बहुतांश राज्यात महाराष्ट्राच्या पुण्यातील कसबा पॅटर्न राबवला.. म्हणजे भाजपसमोर एकास एक उमेदवार दिला.. त्याचा किती परिणाम होतो हे उद्या कळणार आहे.