Zero Hour Ram Mandir : अयोध्येतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर, राम मंदिर उडवण्याची धमकी
अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने दिली आहे. अयोध्या अलर्ट मोडवर आहे.. राम मंदिरासह महर्षी वाल्मिकी विमानतळासारख्या इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जिल्हा पोलिसांव्यतिरिक्त पीएसी म्हणजे Pradeshik Armed Constabulary तैनात करणं सुरु आहे. सर्व परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही करडी नजर ठेवली जात आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि येथील संवेदनशीलता आणि संभाव्य धोका पाहता अयोध्येत नॅशनल सिक्युरिटी गार्डचे म्हणजे एनएसजी कमांडो तैनात करण्याचा निर्णय या आधीच घेतला गेला आहे. मोदी सरकारची पहिल्या दहा वर्षात देशात कोणताही मोठा अतिरेकी हल्ला झाला नव्हता, तशीच ही पाच वर्षही जातील अशी प्रार्थना करुयात.
लोकसभेच्या निकालानंतर सर्वात जास्त खदखद कुठल्या पक्षात असं विचारलं तर उत्तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस असं येईल. आणि त्यातही एकच नाव वारंवार केंद्रस्थानी येतंय.. ते आहे... छगन भुजबळ...
नाशिक लोकसभेची लढत आठवतेय का तुम्हाला... ? नसेल तर मी सांगते.. नाशिक जागेवरुन महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती.. दादांकडून भुजबळ इच्छुक होते.. तर शिंदेंकडून हेमंत गोडसेंची दावेदारी होती.. हा संघर्ष टोकाला गेला.. शेवटी भुजबळांनी उमेदवार घोषित करण्यास उशीर झालाय असे म्हणत माघार घेतली.. त्यानंतर दहा दिवसांनी नाशकात महायुतीनं उमेदवार दिला.. निकाल आला.. आणि महायुतीचा उमेदवार पराभुत झाला...
त्याचं विश्लेषण होण्याआधीच राज्यसभेची निवडणूक लागली.. त्यात भुजबळांना पुन्हा एकदा दादांकडून खासदारकीची चर्चा सुरु झाली.. त्यांनी हि होकार भरला ... पण, काल ऐनवेळी सुनेत्रा पवारांना उमेदावरी मिळाली.. पुन्हा एकदा छगन भुजबळांची संधी हुकली.. आणि आज त्यांनी माध्यमांशी बोलताना.. आपल्या महत्वकांक्षा उघड केल्यात... त्या आधी पाहुयात.

राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटनेची धमकी
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्यानंतर अयोध्या अलर्ट मोडवर आलं आहे. राम मंदिरासह महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरकेतषा वाढव करण्यात आली आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळाचीही सुरक्षा वाढवण्यात आली, एसएसपी राज करण नय्यर यांनी महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी अयोध्या राम मंदिरातील सुरक्षेचाही आढावा घेतला. दहशतवादी संघटनेने दिलेल्या धमकीवर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
राम मंदिरासह अयोध्येत सुरक्षा बंदोबस्तात वाढ
दरम्यान, अयोध्येच्या सुरक्षेबाबत एसएसपी राज करण नय्यर म्हणाले की, अयोध्या धामची सुरक्षा व्यवस्था वेगवेगळ्या भागात विभागली गेली आहे आणि सुरक्षेसाठी पथके तयार केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, विविध झोनमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिसांव्यतिरिक्त पीएसीच्या अनेक कंपन्याही आल्या आहेत, पीएसी तैनात करून सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. संरक्षित, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर पोलिस नजर ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.