Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
जॅवियर बार्डेम यांनी ऑस्कर सोहळ्यात मंचावरून स्पष्टपणे "युद्ध नको आणि स्वतंत्र पॅलेस्टाईन" (No to war and Free Palestine) असा संदेश दिला. त्यांनी त्यांच्या "No to War" असा संदेश असलेला पिन लावला होता.

Javier Bardem says “no to war and free Palestine”: 98 व्या ऑस्कर सोहळ्यात स्पॅनिश अभिनेता जॅवियर बार्डेम यांनी (Javier Bardem) पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि सध्या सुरु असलेल्या युद्धखोरांच्या युद्धामुळे महत्त्वपूर्ण विधान केले. 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' (Best International Feature Film) पुरस्कार जाहीर करण्यासाठी मंचावर आले, तेव्हा त्यांच्यासोबत भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा देखील होती.
काय म्हणाले जॅवियर बार्डेम?
जॅवियर बार्डेम यांनी ऑस्कर सोहळ्यात मंचावरून स्पष्टपणे "युद्ध नको आणि स्वतंत्र पॅलेस्टाईन" (No to war and Free Palestine) असा संदेश दिला. त्यांनी त्यांच्या टक्सिडोवर (कोटवर) "No to War" असा संदेश असलेला पिन लावला होता. रेड कार्पेटवर देखील त्यांनी युद्धविरोधी भूमिका स्पष्ट केली होती. जॅवियर बार्डेम यांनी हे विधान केले तेव्हा प्रियंका चोप्रा त्यांच्या बाजूला उभी होती. बार्डेम यांच्या विधानानंतर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली. जॅवियर आणि प्रियंका यांनी नॉर्वेजियन चित्रपट 'सेंटीमेंटल व्हॅल्यू' (Sentimental Value) याला 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म'चा पुरस्कार प्रदान केला. हा सोहळा अशा वेळी पार पडला जेव्हा मध्यपूर्वेत इराण-इस्रायल युद्धामुळे तणावपूर्ण परिस्थिती आहे. ऑस्करचे होस्ट कोनन ओ'ब्रायन (Conan O'Brien) यांनीही आपल्या सुरुवातीच्या भाषणात सध्याच्या जागतिक भीती आणि गोंधळाच्या वातावरणाचा उल्लेख केला.
Javier Bardem says “no to war and free Palestine” at the #Oscars, earning a huge round of applause from everyone in the room.
— Variety (@Variety) March 16, 2026
(via ABC/AMPAS) pic.twitter.com/7p3whJzhbm
ऑस्कर 2026 चे विजेते
- 'वन बॅटल आफ्टर अनदर' (One Battle After Another) या चित्रपटाने सर्वाधिक 6 ऑस्कर जिंकून सोहळ्यावर नाव कोरले. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पॉल थॉमस अँडरसन) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता यांचा समावेश आहे.
- रायन कूगलरच्या 'सिनर्स' (Sinners) ने 4, तर ग्विलर्मो डेल टोरोच्या 'फ्रँकेन्स्टाईन' (Frankenstein) ने 3 पुरस्कार जिंकले.
- दरम्यान, ऑस्करच्या 'इन मेमोरिअम' (In Memoriam) यादीत भारतीय दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते, परंतु मुख्य सोहळ्यातील व्हिडिओमध्ये त्यांना स्थान मिळाले नसल्याची चर्चा सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















