Zero Hour : Parbhani Corporation : महापालिकेचे महामुद्दे : खड्डे...धुळ... पालिकेपेक्षा नगपरिषद बरी?
तुम्ही पाहताय झीरो अवर.. मंडळी महापालिकेचे महामुद्दे... या विशेष कार्यक्रमात आता आपण जाणार आहोत परभणी शहरात... मंडळी २०११ साली आघाडी सरकारच्या काळात परभणी नगरपरिषदेची महापालिका झाली... शहराची वाढलेली लोकसंख्या... वाढलेली हद्द... आणि अनेक गोष्टींनंतर नगरपरिषदेची महापालिका झाली खरी... पण,
ज्या उत्साहात परभणीकरांनी महापालिका झाल्याचं सेलिब्रेशन केलं... तोच उत्साह अवघ्या चौदा वर्षांमध्ये संपलाय की काय? असंच चित्र आहे... महापालिकेपेक्षा आपली नगर परिषद बरी म्हणण्याची वेळ परभणीकरांवर आलीय.. पाहुयात एक रिपोर्ट
जगात जर्मनी अन भारतात परभणी अशी म्हण परभणी बाबत जगप्रसिद्ध आहे मात्र तुलना जर्मनीशी अन प्रत्यक्ष परभणीचे एखाद्या खेड्यापेक्षा बेक्कार हाल झालेत,शहरातील रस्ते केवळ नावालाच उरले असून खड्डे अन धुळीचे शहर अशी नवी परभणीची ओळख झालीय.२०११ साली नगर परिषदेची परभणी महानगरपालिका झाली परभणीकरांना प्रश्न सुटतील असे वाटले मात्र प्रश्न तर सुटलेच नाहीत उलट भरमसाठ कर माथी पडला त्यामुळेच आता आपली नगर परिषदच बरी होती अशी म्हणण्याची वेळ परभणी करांवर आलीय.पाहुयात एक रिपोर्ट
All Shows

































