Zero Hour Hathras Stampede : हाथरसच्या चेंगराचेंगरीला आयोजकांचा ढिसाळपणा कारणीभूत?
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत.. हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेचं विश्लेषण... त्याला कोण जबाबदार असू शकतं.. यासह घटनेचे सर्व अँगल्स पाहिल्यानंतर आता वेळ झालीय महाराष्ट्राने दिलेला कौल पाहण्याची.. त्यासाठी जावूया आपल्या पोल सेंटरवर...
मांढरदेवीला जवळपास ३ लाखांची गर्दी होती, तर कुंभमेळ्यात २० ते ५० लाख लोकं होती, हाथरसचे व्हिडिओ बघितले तर तिथे सुद्धा लाखावर लोक जमा झालेली होती. जिथे अशी गर्दी तिथे चेंगराचेंगरीची भीती वाढतेच. बरं चेंगराचेंगरी फक्त धार्मिक ठिकाणीच होते असं नाही..जगभरात स्टेडियममध्ये, ऑर्केस्ट्रा शो मध्ये, अगदी राजकीय मेळाव्यात सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. बऱ्याचदा तर एखादी छोटी अफवा सुद्धा गोंधळाचं वातावरण वाढण्यासाठी आणि चेंगराचेंगरीसाठी पुरेशी ठरते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५४ साली पहिल्याच कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती, प्रयागच्या या कुंभमेळ्यात ८०० लोकांनी जीव गमावला होता तर २ हजारपेक्षा जास्त जखमी झाले होते असं सांगितलं जातं... या घटनेचा पंतप्रधान मोदींनी २०१९ च्या प्रचार सभेतही उल्लेख केला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुंची छबी जपण्यासाठी त्या दुर्घटनेकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही अशी टीका मोदींनी केली होती. एकंदरीतच चेंगराचेंगरीच्या घटनांचा असा इतिहास राहिला आहे. तरीही आपल्याकडे गर्दीचं व्यवस्थापन हा विषय दुर्लक्षित आहे. तसंच अशा आपत्काळात काय करायचं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. त्याबाबत जागरुकता वाढवली जाईल अशी आशा करुयात आणि अशा दुर्घटनेत कुणाचा जीव हकनाक जाणार नाहीत अशी प्रार्थना करुयात.
या बातमीसोबतच झीरो अवरमध्ये आज इथेच थांबुयात. उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटुयात. पाहात राहा एबीपी माझा.