Zero Hour Mahayuti : बैठका-भेटीगाठी, महायुतीत खलबंत; देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब?
मंडळी... झीरो अवरची सर्वात दिवसभरातील सर्वात मोठ्या बातमीनं.. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या भेटीनं.. ही भेट आहे.. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्रीपदाचे सर्वात प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीसांची..
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भेट होतीय मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर.. आणि खुद्द देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर पोहोचले.. सात वाजून दहा मिनिटांनी फडणवीस तिथं दाखल झाले.. आणि पावणे आठला म्हणजे तब्बल चाळीस मिनिटांनी परतले..
पण, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वर्षा बंगला.. आणि देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला.. दोन्ही बंगल्यावर आज संध्याकाळनंतर भेटींना वेग आला.. दोन्ही बंगल्यावर अजुनही हालचाली सुरु आहेत.. त्याच जाणून घेणार आहोत.. त्यासाठी आपल्यासोबत आहेत वर्षा निवसस्थानावरुन सुरज सावंत तर सागर बंगल्यासमोरुन अभिषेक मुठाळ आहे.. सुरुवात अभिषेक पासून..
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
