Zero Hour : मोदींनी सांगितली 'एनडीए'ची नवी व्याख्या! 09 जूनला होणार शपथविधी!
Zero Hour : मोदींनी सांगितली 'एनडीए'ची नवी व्याख्या! 09 जूनला होणार शपथविधी! आज दिल्लीत पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत.. घटकपक्षांनी नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा पसंती दिलीये.. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीच्या सुरुवातीला मोदींच्या निवडीचा प्रस्ताव मांडला.. त्याला अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, अजित पवार, चिराग पासवान, कुमारस्वामी, जितन राम मांझी, अनुप्रिया पटेल आणि पवन कल्याण यांनी अनुमोदन दिलं.. त्यानंतर जे पी नड्डा यांनी संविधान हॉलमध्ये उपस्थित प्रत्येक सदस्यांनाही विचारलं.. आणि त्यानंतर प्रत्येक सदस्यांनी एकमतानं मोदींची निवड केली.. पुढे एनडीएच्या सदस्यांनी राष्ट्रपतींची भेट घेवून सत्तास्थानपेचा दावा केला.. पण, आजच्या बैठकीत मित्रपक्षांच्या नेत्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषणही झालं.. पाहुयात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात एनडीएची नवी व्याख्या सांगितली.. पाहुयात