Zero Hour : भेटीगाठीतून विधान परिषदेचं गणित सुटणार?
Zero Hour : भेटीगाठीतून विधान परिषदेचं गणित सुटणार? राज्यात इतक्या घडामोडी घडत असतानाच.. अकरा जागांसाठीच्या विधान परिषदेच्या निवडणुका अवघ्या चार दिवसांवर आल्यात... त्यात मविआनं तिसरा उमेदवार दिल्यानं निवडणूक होतीय.. त्यातच आजच मविआचे अधिकृत उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी विधानभवन परिसरात जवळपास सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्यात.. सुरुवातीला त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळच महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केली.. त्यात शिवसेनेचे नेते भरत गोगावले, मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते.. याभेटीनंतर काही मिनिटांमध्येच मिलिंद नार्वेकर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंशीही भेटले.. अवघ्या चार दिवसांपूर्वीच मिलिंद नार्वेकरांनी भाजप नेत्यांच्याही भेटी घेतल्या होत्या.. त्यामुळे आता या सगळ्या भेटी गाठींचा किती फायदा होतो.. हे तर १२ जुलैला होणाऱ्या मतदानावेळीच कळेल.. आणि त्याकडे आपलं लक्ष असेलच... दरम्यान दगाफटका होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगत सर्वच पक्ष आपले आमदार एका ठिकाणी एकत्र आणताना दिसले. ठाकरेंपाठोपाठ महायुतीतील शिवसेना सुद्धा आपले आमदार पंचतारांकीत हॉटेलमध्ये हलवणार आहे. त्यासाठी ६० रुम्स बुक केल्याचं समजतंय. राष्ट्रवादी काँग्रेस उद्या संध्याकाळी आपल्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवणार आहे. तर भाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे. पुढचे तीन दिवस या सर्व आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये असेल.