Zero Hour | एकनाथ शिदेंच्या वाढदिवशी उदय सामंत फडणवीसांसोबत चंद्रपुरात! कारण काय?
((मंडळी, एखाद्या घरात तीन विचारसरणींच्या व्यक्ती जर एकत्र आल्या... तर काय होईल... तुम्ही म्हणाल की काही हो ना हो... पण मंडळी, वाद मात्र नक्कीच होत राहतील..
आता तुम्ही म्हणाल की आम्ही हे झीरो अवरमध्ये काय सांगतोय.. तर मंडळी.. सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्येही हेच सुरु आहे... असं आपण म्हणू शकतो.. कारण, वरकरणी महायुती सरकारमध्ये सारं आलबेल आहे.. असं जरी दिसत असलं.. किंवा असं म्हणून सारं आलबेल आहे... असं दाखवण्यात राज्य सरकारच्या प्रमुखांना यश येत असलं... तरी मंडळी...
अगदी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आपण पाहतोय... की महायुती सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांनी कसा संघर्ष सुरु आहे..))
याशिवाय आणखी कोणत्या गोष्टीमुळे महायुतीत धुसफूस आहे.. त्यातल्या आणखी तीन गोष्टी सांगणार आता सांगतो.... त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की नेमकं काय सुरु आहे..
पहिली गोष्ट.... मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी...
आता जर गेल्या अठ्ठेचाळीस तासांचा रिकॅप केला... तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घरी जाऊन भेट घेतली... त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंचे सध्याचे तीन सर्वात विश्वासू नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले.. तिकडे खासदार श्रीकांत शिंदेंनी सर्वपक्षीय आमदारांना डिनरसाठी निमंत्रित केलं. त्याच डिनर डिप्लोमसीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा दिल्ली गाठली.. इतकंच नाही तर आज शरद पवारांच्या हस्ते अवघ्या काही मिनिटांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सरहद संस्थेकडून देण्यात येणारा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला.. बरं, याशिवाय आणखी एक गोष्ट आहे... तीही आपण पाहणार आहोत..
पण, त्याआधी महायुतीसंदर्भातील दुसरी मोठी गोष्ट... ती म्हणजे पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला संघर्ष...
आता मंडळी.. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला संघर्ष काही केल्या संपत नाहीय.. त्यामुळं महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी हा वाद दिल्ली दरबारी नेला .. आता हा वाद सुटेल तेव्हा सुटेल... पण, त्याआधीच दोन्ही जिल्ह्यांच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठका लावल्या... पण त्या दोन्ही जिल्ह्यांमधल्या शिंदेंच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली.. की गेले.. तेही आज पाहणार आहोत...
पण, त्याआधी महायुतीतील तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट... आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये केलेला बदल..
मंडळी.. आज सकाळी मंत्रिमंडळाची बैठक झाली.. त्या बैठकीआधी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीत मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि महसूलमंत्र्यांसह आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत-पुनर्वसन मंत्र्यांचा समावेश होता. त्यामुळं विद्यमान आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता... पण एकनाथ शिंदेंकडे नियमांना पूरक असलेलं खातं नसल्यानं त्यांना समितीत स्थान नव्हतं.. आणि त्यामुळं राजकीय वर्तुळात कालपासूनच चर्चा होती की एकनाथ शिंदेंना समितीतून वगळण्यात आलं.. ती चर्चा शिगेला पोहोचली आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णयही झाला...
यासह गेल्या महिन्याभरात झालेले छोटेमोठे संघर्ष पाहिले तर एक प्रश्न... जनतेच्या मनात नक्कीच येतो... आणि तोच प्रश्न आहे आपला आजचा झीरो अवरचा प्रश्न... आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला..
All Shows

































