Zero Hour Guest Center : विशाळगड मोकळा श्वास कधी घेणार? Satej Patil Exclusive
Zero Hour Guest Center : विशाळगड मोकळा श्वास कधी घेणार? Satej Patil Exclusive ऐतिहासिक विशाळगडाला पडलेला अतिक्रमणाचा वेढा.. त्या विरोधातील आंदोलनं..आणि त्यावरुन रंगलेला वाद... विशाळगडावरील अतिक्रमणांचा विषय जितका जुना आहे, तितकाच तो गंभीर सुद्धा आहे... जवळपास सगळ्या महत्वाच्या गडांवर अतिक्रमण आहेत, कुठे घरं, कुठे दुकानं आहेत तर कुठे दर्गा, कुठे मजार आहेत.. २०२२ साली नोव्हेंबर महिन्यात शिंदे सरकारने सर्जिकल स्ट्राईक करत प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीसभोवतालचं अतिक्रमण पाडलं आणि स्वराज्याच्या शत्रूचं उदात्तीकरणं थांबवण्याचा प्रयत्न केला होता.. त्यानंतर डिसेंबर महिन्यात शिंदे सरकारने विशाळगडावरील अतिक्रमण काढायचा प्रयत्न केला पण त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली गेली.. काहींनी मुस्लिम समाजाविरोधात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला.. तर काहींनी ही बांधकामं जुनी असल्याचं सांगत कायदेशीर पळवाटांचा आधार घेतला.. २०२३ साली उच्च न्यायालयाने अतिक्रमणं हटवण्यास स्थगिती दिली. त्यानंतर बैठका घेत, सामोपचाराने आणि कायद्याच्या कक्षेत हा विषय सोडवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु झाले पण तेव्हापासून हा मुद्दा सतत चर्चेत आहे. यावरुन आंदोलनही सुरु झाले. शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेत रविवारी १४ तारखेला माजी खासदार संभाजीराजेंनी अतिक्रमणविरोधी आंदोलनाचं नेतृत्व केलं.. तिथे शिवभक्तांचा आक्रोश पाहायला मिळाला, काही तोडफोडीच्या घटना घडल्या आणि हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. काल या प्रकरणात आजच्या सर्व घडामोडी आणि आज कोल्हापूरचे खासदार शाहु महाराज, आमदार सतेज पाटील विशाळगडाला भेट देण्यासाठी गेले होते तेव्हा काय झालं हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे पण त्याआधी पाहुयात याच विषयावरील झीरो अवरमध्ये विचारलेला आजचा पहिला प्रश्न..