एक्स्प्लोर

Zero Hour: विधानपरिषद निवडणूक,दानवेंची दिलगिरी ते हाथरसमधील चेंगराचेंगरी;झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

नमस्कार मी सरिता कौशिक... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. आमदारांची पळवापळवी ... ते उमेदवारांची फोडाफोडी.. हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही.. आणि गेल्या पाच वर्षांतलं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं.. तर लक्षात येतं की अशा घटनांमध्ये चांगलीच वाढ झालीय.. आताही असाच प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहिलाय.. समोर विधान परिषद निवडणूक.. कोण कोणत्या पक्षासोबत राहणार.. कोण कोणत्या पक्षात जाणार..

गेल्या विधानसभेला राज्यात जिथं सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी असे चार प्रमुख पक्ष होते.. तिथ आज सहा पक्ष झालेत. त्यामुळे राज्यात ग्रामपंचायतीच्याही निवडणुका लागल्या.. तरी त्या प्रतिष्ठेच्या बनतात... आणि हेच आपण गेल्या अडीच वर्षांमध्ये पाहतोय... त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा अपवाद उरल्या नाहीएत. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांवर आलेली विधान परिषदेची निवडणूकही रंजक बनलीय..

बारा जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवाराचा रिंगणात आहेत.. मविआकडे दोन आमदारांपुरतं संख्याबळ असताना त्यांनी तीसरा उमेदवार दिलाय.. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक होणार हे नक्की.. आणि त्यामुळेच दोन्ही आघाड्यांना लहान-मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत.. मतांची जुळवा जुळव करावी लागणारय.. याच निवडणुकीमुळे अपक्ष आमदारांनाही विशेष महत्व आलंय.. अशी निवडणूक महागडी पण असते असे हि ऑफ द रिकॉर्ड सांगितल्या जाते ... तीन जागा जिंकण्याचं संख्याबळ नसतानाही मविआन तीन उमेदवार रिंगणात उभे केलेत.. आणि दावा केलाय.. की तीनही उमेदवार जिंकणार...? त्यावरच होता आपला पहिला प्रश्न.. तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला..

हा प्रश्न का पडतोय.. कारण, महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा इतिहास.. त्यासाठी आजची राजकीय स्थिती समजून घेणं गरजेचं बनतं.. 
आधी एक आकडेवारी सांगते..  विधान परिषदेच्या एका जागेसाठी तेविस मतांचा कोटा असेल...  सभागृहातील आजचं बलाबल पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे १२, शंकरराव गडाखांना धरुन उद्धव ठाकरेंच्या सेनेचे सोळा आणि काँग्रेसचे ३७ आमदार आहेत.. आणि महाविकास आघाडीचा विचार केला. तर समाजवादी पक्षचे दोन शिवाय, माकप आणि शेकापचे प्रत्येक एक आमदार आहेत.. ही सगळी आकडेवारी एकत्र केली तर मविआचा आकडा होता 69 होतो. जर या सगळ्या आमदारांनी वेळेत मतदान केलं.. आणि त्यांची मतं बाद नाही झाली तर मविआचे तीन आमदार निवडून येतील.. पण, तेही एकदम काठावर... मविआला तीन आमदार निवडून आणण्यासाठी 69 मतांची गरज आहे.. 
पण, गेल्या विधान परिषदेचा अनुभव पाहाता, मविआचा आपली मतं आपल्याच बाजूनं ठेवण्याचा आव्हान असणार आहे.. दुसरीकडे शेकापच्या जयंत पाटलांनी मात्र, आपल्याच विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.. 

जयंत पाटलांना विश्वास असला तरीही एक मत बाद झालं तरी उमेदवार पडू शकतो.. आता महायुतीचे आकडेवारी आणि त्याच्यासंदर्भातली शक्यता सांगते. महायुतीत आजच्या आकडेवारीनुसार लहान मित्र पक्ष आणि अपक्षांच्या पाठिंब्यानं भाजपचे एकशे दहा, अपक्षांच्या पाठिब्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्रेचाळीस, शिवसेनेचे अडतीस आमदार आहेत.. एकनाथ शिंदेंना बच्चू कडू, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, यांच्यासह दहा आमदारांचा पाठिंबा आहे.. त्यामुळे त्यांची संख्या अठ्ठेचाळीस होते.. एकूण आकडेवारी होते दोनशे एक... 
म्हणजेच जर महायुतीला नऊ आमदार निवडून आणायचे असतील तर त्यांना दोनशे सात मतांची गरज असणारय.. म्हणजे आजच्या आकडेवारीनुसार सहा मतं कमी.. 
असंच चित्र दोन हजार बाविसमध्येही होतं.. त्यावेळी संख्याबळ असूनही मविआचा एक उमेदवार पडला होता.. आणि संख्याबळ नसताना भाजपनं एक अतिरिक्त जागा जिंकली होती.. आणि आताही अशीच स्थिती निर्माण झालीय... त्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला असेल.. मात्र, यावेळी महायुतीसमोरच आव्हान आहे.. कारण, गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुतीतील लहान पक्षांची नाराजी वाढलीय.. 
त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे बच्चूू कडू यांच्या सारख्या नाराज मित्रपक्षांची समजूत काढणं... लोकसभेच्या निकालानंतर प्रमुख पक्षांमध्ये वाढलेला कम्यूनिकेशन गॅप दूर करणं.. सहा मतांसाठी मविआतील नाराजांना गळ घालणं.. 
म्हणूनच की काय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात.. त्यांनी कालच आपल्या आमदारांची बैठकही घेतली.. आणि सगळ्या ९ जागा निवडून आणण्याच्या सूचना केल्यात... आणि इकडे त्यांचे आमदार प्रताप सरनाईकांनी थेट शेकापच्या जयंत पाटलांचीच जागा धोक्यात असल्याचा दावा केला...

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : 'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anna Bansode : मी अजित पवारांचा कट्टर समर्थक; घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणारABP Majha Headlines :  1:00PM : 6 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 06 जुलै 2024: ABP MajhaManoj Jarange Shantata Rally : हिंगोलीच्या वेशीवर मनोज जरांगेंचं जोरदार स्वागत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी हिंगोलीकर सज्ज, स्वागतासाठी 40 फूट लांब आणि 150 किलोचा हार 
मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी हिंगोलीकर सज्ज, स्वागतासाठी 40 फूट लांब आणि 150 किलोचा हार 
नाशकात एसीबीचा ट्रिपल धमाका! महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात
नाशकात एसीबीचा ट्रिपल धमाका! महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात
अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांची पीकविमा कंपनीकडून थट्टा; हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर अगदी तुटपूंजी रक्कम
अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांची पीकविमा कंपनीकडून थट्टा; हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर अगदी तुटपूंजी रक्कम
आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Embed widget