Zero Hour : विशेष प्रचारक म्हणून नितीन गडकरी मैदानात,महायुतीला फायदा होणार का?
Zero Hour : विशेष प्रचारक म्हणून नितीन गडकरी मैदानात,महायुतीला फायदा होणार का?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) संपूर्ण महाराष्ट्र हृदयापासून ओळखतो, त्यांच्यावर प्रेम करतो. विधानसभेत भाजपच्या विजयकरता ते आता पूर्ण ताकदीनिशी उतरतील. नितीनजींना मानणारा एक मोठा वर्ग आहे. नितीन गडकरी आमचे बडे नेते आहे. कोर ग्रुपचे प्राईम मेंबर आणि पार्लमेंटरी बोर्डचे देखील ते मेंबर आहे. परिणामी, भाजपाच्या उज्वल भविष्याकरता, महायुतीचे सरकार आणण्याकरता नितीनजी पूर्ण एक महिना देणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. ते नागपूर (Nagpur News) विमानतळावर आले असता ते बोलत होते.
आगामी विधानासभेच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने भाजपचं मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) या चार नेत्यांवर विधानासभेसाठीची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत. तर अनेक भाजपचे नेते यांचा यात समावेश असणार आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.