Zero Hour Full EP : भास्कर जाधव पक्षांतर करणार? कोकणात ठाकरे गटाला आणखी एक खिंडार?
Zero Hour Full EP : भास्कर जाधव पक्षांतर करणार? कोकणात ठाकरे गटाला आणखी एक खिंडार?
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा असणारे कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय हे कोणाला सांगता येत नाही. मी गोष्टी आधी करतो आणि नंतर सांगतो. मी ठाकरे गटात (Shivsena Thackeray Camp) नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही. माझ्या वक्तव्यावर कोण काही सातत्याने बोलत असेल तर त्याबाबत भाष्य करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. मी नाराज आहे, या बातम्यांमध्ये तथ्य नाही. ज्या गोष्टी माझ्या मनात नाहीत, त्यावर मी खुलासा करत नाही, असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटले. ते सोमवारी रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
भास्कर जाधव यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांना घरी बोलावून घेतले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी मी ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. तसेच भास्कर जाधव यांनी परस्परच आपण रत्नागिरीतील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेत असल्याची घोषणा केली. मी हीच चर्चा करण्यासाठी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना बोलावून घेतल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले. मी ही जबाबदारी नुसती अंगावर घेऊन थांबणार नाही तर पक्षाला यश मिळवून देईल, असे जाधव यांनी म्हटले. एकीकडे भास्कर जाधव हे आपण ठाकरे गटात नाराज नसल्याचे सांगत असले तरी त्यांनी परस्पर आपण रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी खांद्यावर घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
All Shows

































