Zero Hour : अशोक चव्हाण यांच्या भूमिकेमुळे मविआत जागावाटपाचा पेच ?
Zero Hour : अशोक चव्हाण यांच्या भूमिकेमुळे मविआत जागावाटपाचा पेच ? उमेदवार वेगळे असतील ... मतदार क्षेत्र वेगळे असेल ... नेते वेगळे असतील .... पण महायुती असो किंवा महाआघाडी येणाऱ्या लोक सभेच्या जागा वाटपाला घेऊन, उमेदवारीला घेऊन, जागांच्या रस्सीखेचेला घेऊन अडचणी मात्र सारख्याच आहेत ... मात्र जिथे गूळ तिथे मुंग्या .... आणि त्यामुळेच सत्तेत असणाऱ्या महायुतीच्या अडचणी काकणभर जास्तच आहेत, कारण सगळ्यांना इथे हिस्सा हवाय. महायुतीला आज नक्की कुठल्या घडामोडींना सामोरे जावे लागले हे तर आपण बघणार आहोतच , पण आधी बघुयात महाविकासाघाडीसमोरचे आजचे आवाहन... ((आजघडीला राजकारणात कधी कोणता नेत्या ... कोणत्या पक्षात जाईल.. आणि कोणत्या नेत्यावर काय आरोप करेल.. याचा अंदाज लावणं शक्य नाहीय.. म्हणजे एकवेळ निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाज लावणं शक्य होईल.. पण, राजकारण्यांच्या चालींचा अंदाज लावणं कठिण आहे.. हे का सांगतेय.. )) तर त्यासाठी काही महिने मागे जावूयात.. राज्यात महाविकास आघाडीच्या बैठकांच्या बातम्या नियमित येत होत्या.. त्यांची दृश्यही यायची.. बैठकांमध्ये काँग्रेसकडून आघाडीवर कोण असायचं.. तर त्यांचं नाव आहे.. अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात.. हे तीन नेते प्रामुख्यानं मविआच्या बैठकांमध्ये दिसाय़चे.. बैठकीनंतरही पत्रकारांसमोर यायचे.. आता फेब्रुवारीत अशोक चव्हाण भाजपवासी झाले. आणि मविआच्या बैठकांमध्ये पृथ्वीराज बाबांची एन्ट्री झाली. इकडे बैठकांवर बैठका झाल्या.. पण, संपूर्ण ४८ जागांवरच जागावाटप मात्र, शक्य झालेलं नाहीय.. किंवा झाल असलं तरी ते जाहीर करु शकले नाहीएत...आत ते जागावाटप का रखडलंय.. जागावाटपाला उशीर का होतोय.. आणि सांगली, भिंवडी सारख्या मतदरासंघातून काँग्रेसची गळचेपी होतीय.. ह्यावर आज महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी एक मोठा दावा केलाय. मविआत जो काही जागावाटपाचा तिढा निर्माण झालाय त्याला सर्वस्वी अशोक चव्हाण जबाबदार आहेत.. मविआच्या जागावाटपासाठी झालेल्या प्राथमिक बैठकांमध्ये अशोक चव्हाण होते.. त्यांच्याच भूमिकेमुळे जागावाटपाचा पेच निर्माण झाल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे बडे नेते खासगीत बोलताना सांगतायेत..आणि ह्याचे थेट संकेत आज नाना पटोलेंनी आपल्या वक्तव्यात दिले ... महाराष्ट्र काँग्रेसच्या याच भूमिकेवर आहे आपला पहिला प्रश्न.. तो पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला..