(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour : अजितदादा-फडणवीसांचा वाढदिवस ते ठाकरेंचा दिल्ली दौरा; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Zero Hour : अजितदादा-फडणवीसांचा वाढदिवस ते ठाकरेंचा दिल्ली दौरा; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस... आठवड्याची सुरुवात आज दिवसभरातील सर्वात मोठ्या बातमीनं... आज महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस... आज आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 54 तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार 65 वर्षांचे झालेत.. दोन्ही नेते कायम राज्याच्या राजकारणात होणाऱ्या जवळपास प्रत्येक चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.. दोन्ही नेते आपआपल्या युनिक वर्क स्टाईलसाठी ओळखले जातात... दादा आपल्या प्रशासकीय कणखरतेसाठी... तर फडणवीस आपल्या वोर्कोहोलिक पर्सनॅलिटी आणि राजकीय चातुर्यासाठी... दोन्ही नेत्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा... आता म्हटलं तर दोघेही उपमुख्यमंत्री महत्वाकांक्षी आहेत ...दोघांनाही मुख्यमंत्री बनायचे आहे ...एकाने मी पुन्हा येईन हे म्हटले आहेच तर दुसऱ्याने हि आपली महत्वाकांक्षा लपवलेली नाही ... मात्र काही काळासाठी ह्या दोघांनीही मुख्यमंत्रीपदाच्या ह्या लालसेपासून टाईम प्लिज घेतली आहे. अगदी कालच देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पुण्याच्या मेळाव्यात मुख्यमंत्री महायुतीचाच असणार असे म्हटले पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे विचारू नका, हा विषय इथेच संपला असे म्हटले ...तिथे अजितदादांनि सुद्धा सर्वांनी मिळून ते ठरवायचे असे म्हटले ...पण उत्साही कार्यकर्त्यांसाठी मात्र दिल है कि मानता नही ... दादांच्या वाढदिवसानिमित्त केकवर तर भावी मुख्यमंत्री लिहिलेच पण त्याचबरोबर शहरा शहरात पोस्टरवर हि अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणूनच उल्लेख केल्या गेलाय ... तर तिथे आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार हि मागे नव्हते ... शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी तर पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री होणार असा पाढा अगदी आजही गिरवला. त्यातच अजित पवारांचं एक वक्तव्य.. राजकीय दृष्ट्या महत्वाचे म्हणावे लागेल ... ज्यानं महायुतीचं थोडं टेन्शन... आणि कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढू शकतो. आधी ते वक्तव्य पाहुयात.. मग विश्लेषण...