Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत तरी कुठे? ते लोकसभा किंवा राज्यसभेत उपस्थिती का लावत नाहीत? दिल्लीतल्या आंदोलकांवर झालेल्या कारवाईवरून होणाऱ्या आरोपांना ते उत्तर कधी देणार? असे अनेक प्रश्न विरोधक विचारताहेत... मात्र या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सरकारकडून कुणीच पुढे येत नाहीय.. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांची धार दिवसेंदिवस आणखीनच तीव्र होत चाललीय...एकीकडे आंदोलकांविरोधात वापरलेल्या पॅलेटगनवरून सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या जाताहेत... तर दुसरीकडे त्याच पॅलेट गनसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काही महत्त्वाच्या सूचना केल्यात... काय आहेत त्या सूचना... पाहुयात
लोकसभा असो किंवा राज्यसभा...
विरोधी बाकांवर बसलेल्यांनी मोर्चा वळवलाय तो एकाच व्यक्तीकडे...
ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा...
परीक्षा सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं काल लोकसभेत वादळी चर्चा झाली...
विरोधी पक्षेनेते राहुल गांधींनी अमित शाहांवर टीकेची झोड उठवली
All Shows
































